मार्को पोलो.. एक व्यापारी आणि प्रवासी... सिल्क रोड पार करून कुब्लाई खानाच्या मंगोलियात अडकून पडतो.. मंगोलियन आणि चीनी लोकांच्या संस्कृतीवर प्रवासवर्णन लिहितो...आणि जगाला सदैव भीती वाटावी असा शब्द निर्माण करतो... assassin..
एकंदरीत मुस्लीम आणि त्यांचे अंतर्गत हेवे-दावे, पंथ,उप पंथ, श्रेयवाद आणि त्यातून उद्भवणारी भांडण-बखेडे अस बरच काही गुंतागुंतीच आहे... पण तसे असण्याची एक सकारात्मक बाजूसुद्धा आहे ती म्हणजे या गोष्टीमुळे मुस्लीम धर्मात प्रवाहीपणा असल्याचे जाणवते . मुस्लीम धर्माइतका प्रवाही धर्म दुसरा नाही, तरी तो इतका कट्टर आणि सनातनी का राहिलाय हे एक आश्चर्यच आहे..असो...
‘शिया’ मुस्लिमातील इस्माईल-इब्न-जफर या इमामाला अनुसरणारे ‘इस्माईली’ पंथीय म्हणून ओळखल्या जातात. या पंथाचा इतिहास मोठाच आहे... या पंथातील ‘निझारी’ या व्यक्तीची जेंव्हा ‘खलिफा’ म्हणून नियुक्ती केली जाते तेंव्हा त्याला अंतर्गत विरोध होतो. तो शत्रूपासुन वाचण्यासाठी आणि आपल्या इस्माईली विचारांचा प्रचार करण्यासाठी इजिप्तमध्ये जातो. .. तिथे त्याला लोकांचा पाठींबा मिळतो आणि ‘निझारी’ इस्माईली म्हणून नवीन पंथ तयार होतो. या पंथाच्या मुख्य इमामाला ‘आगा खान’ म्हणून ओळखल्या जाते. आज ‘चौथा आगा खान’ या पंथाचा इमाम असून त्यांचे धार्मिक केंद्र पोर्तुगालमध्ये आहे...
निझारी पंथ खूप लढवय्या समजल्या जात असे. त्या पंथातील लोक आपल्या इमामाला अल्लाहचा ‘नूर’ (दैवी प्रकाश) मिळालेला व्यक्ती समजत असत. या इमामासाठी लढायला तयार असणाऱ्यांना ‘फिदाई’ म्हटल्या जात असे. हे फिदाई प्रसंगी स्वतालाही मारायला मागे पुढे बघत नसत. आपल्या पंथाच्या उत्थानासाठी आणि संरक्षणासाठी ते तत्पर असत. त्यांच्याकडे पुरेसे सैन्य नव्हते त्यामुळे मोजक्याच फिदाईच्या भरवशावर सर्व निभावून न्यावे लागायचे. त्यासाठी मोजक्याच फिदाईनां युद्धात, गुप्तहेरी करण्यात आणि नियोजनबद्ध कट रचून आपल्या शत्रूचा बिमोड करण्यासाठी प्रशिक्षित केल्या जात असे. ते उच्च पदस्थ शत्रूलाच सहसा संपवत असत. रशीद अद-दिन सिन्न हा त्यांचा म्होरक्या आणि प्रशिक्षक होता.युरोप, मध्य आणि मध्य-पूर्व आशिया पासून पार तिकडे मंगोलिया-चीन पर्यंत या ‘फिदाई’ मारेकऱ्यांचा दरारा होता. तशा अनेक कथा, दंतकथा आणि साहित्य उपलब्ध आहे.
मार्को पोलोने ‘फिदाई मारेकऱ्यांना’ पश्चिमी जगात कुप्रसिद्ध केले. मार्को पोलोनुसार रशीद अल-दिन सिन्न (हा ‘ओल्ड म्यान ऑफ द मौंटन’ म्हणूनसुद्धा ओळखल्या जातो ) हा आपल्या फिदाई अनुयायांना ‘चरस’ नावाचे अमली पदार्थ देवून त्यांच्या निर्णय क्षमतेवर नियंत्रण ठेवतो व त्यानंतर त्यांना आपल्या हिशेबाने प्रशिक्षित करून मारेकरी म्हणून पाठवतो. त्यांच्या नीडरतेचे कारण ‘चरस’ हा अमलीपदार्थ आहे असे मार्को पोलो मानतो.
आता ‘चरस’ याला ‘हशीश’ किंवा ‘हश’ (Ḥash) असे म्हणतात म्हणून या फिदाई मारेकर्यांना मार्को पोलो ‘हशिशीन’(Hashishi) म्हणजे हशीश सेवन करणारे म्हणायला लागला. याचाच उच्चार अरेबिक भाषेत अनेकवचनात Assasiyeen करण्यात आला... ज्याचे पुढे इंग्रजीत assassin झाले... assasin म्हणजे ‘व्यावसायिक हत्यारे’ असा अर्थ प्राप्त होण्याची हि एक मनोवेधक गोष्ट... (या हशीशी लोकांच्या मस्त दंतकथा आहेत... त्याबद्दल नंतर कधी...)
#शब्दांच्या_गोष्टी
#Words_words_Words