दंतकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दंतकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० डिसेंबर, २०२३

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था




    
विचक्राफ्ट
( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होताजादू, टोना आणि तत्सम बाबीशी संबंधित हा धर्मसैतानाचीपूजा करणारा म्हणून ओळखल्या जातो
जादू-टोण्यातूनजन्म झालेला हा धर्म पुढे अध्यात्मिकतेच्या दिशेने प्रवास करतो; मात्र त्यानंतर जास्त काळ टिकून राहू शकला नाही. फक्त पन्नास वर्ष हा धर्म जोमात होता, नंतर मात्र याला उतरती कळा लागली. मात्र पन्नास वर्षाच्या आपल्या प्रभावामुळे याने इतिहासात आपले नाव कायम केले. इतर धर्माप्रमाणे या धर्मातही साधना आहे, पूजा विधी आहे, अलौकिक तत्वज्ञानसूद्धा आहे.


     विचजिला आपल्याकडेडायनम्हणून ओळखल्या जाते. यांना कधीही समाजात सन्मानाचे स्थान मिळाले नाही. नेहमी त्यांचा संबंधअनिष्टांशीजोडण्यात आला. जादूचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करणाऱ्यानाही दुर्दैवाने स्वतःची वेगळी ओळख ठेवता आली नाही


    चौदाव्या शतकापासून जवळपास अठराव्या शतकांपर्यंत, ‘विचक्राफ्टख्रिश्चनविरोधी मानल्या गेल्यामुळे ते निषिद्ध होते. सैतानाशी संगनमत करून अद्भुत शक्ती मिळवणारे निधर्मी, देवांचे शत्रू म्हणून त्यांना मारून टाकण्यात येत असे. हजारो लोकांना तेविचक्राफ्टला मानणारे असल्याच्या नुसत्या संशयावरून, त्यांचे  हाल-हाल करून , त्यांना मारून टाकल्या गेले. त्यांच्या बाबत रंजक आणि थरारक गोष्टी पसरवण्यात आल्या. ते सैतानाशी स्वतःच्या रक्ताने लिहिलेला  करार करतात, सैतानासोबत दरवर्षी एकदा मध्यरात्रीला सर्व मिळून मेजवानी करतात तेंव्हा विधी म्हणून सैतानाच्या पार्श्वभागाचे चुंबन घेतात आणि मेजवानीत लहान मुलं भाजून खातात. या सर्व कथांना कुठलाही पुरावा नाही मात्रडायनया प्रकाराबाबत राग, द्वेष, आणि मुख्य म्हणजे भीती पसरवण्यासाठी त्या पुरेशा होत्या. या धर्माला मानणाऱ्या लोकांच्या बाबतीतील प्रत्येक गोष्ट अतिरंजित, अतिशोयक्तीपूर्ण होतीत्यामुळेचविचहंटिंग' नावाचा एक नवा प्रकार सुरु झालाअशा सर्वडायन' ला पकडून मारून टाकण्यासाठीविचहंटरम्हणून जगावेगळा  व्यवसायच सुरु झाला. दुसऱ्या महायुद्धानंतरविचक्राफ्टधर्म म्हणून उदयाला येऊ लागला होता मात्र लगेच १९५३ मध्ये विचक्राफ्ट विरोधी कायदा अंमलात आल्यामुळे त्याचा पुढील प्रसार थांबला


    विचक्राफ्टया शब्दाचे तीन अर्थ आहेत हे आधी आपण स्पष्ट करायला हवे. पहिला अर्थ म्हणजेजादू ही एक कला आहेज्यामध्ये चांगल्या-वाईट गोष्टीसाठी मंत्राचा उपयोग करून जादू टोणा केल्या जातो. दुसरा अर्थ म्हणजे सैतानाची पूजा करण्याच्या पद्धतीलासुद्धाविचक्राफ्टम्हटल्या गेले, तर तिसरा अर्थ म्हणजे एक धर्म म्हणून. (विचक्राफ्ट: ‘धर्म' या अर्थाने वापरावा लागतो तेंव्हा त्यातील ‘W’ हे अक्षर मोठ्या लिपीतील लिहिल्या जाते. इतर अर्थासाठी छोटा ‘w’ वापरतात.) गमतीशीर गोष्ट म्हणजे हे तिन्ही अर्थ एकमेकांत इतके गुंतून आहेत की, त्याचा तोटा विचक्राफ्टलाधर्ममानणाऱ्या लोकांना झाला.


    यासंदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ‘पॅगनम्हणजे निसर्गपुजकांचा धर्म. या निसर्गपुजकांच्या अनेक उपशाखा आहेत. त्यातील एक शाखा म्हणजेविचक्राफ्टहोय असे अनेक अभ्यासक समजतात. जेराल्ड गार्डनर नावाच्या व्यक्तीलाविचक्राफ्टया धर्माचा प्रणेता मानल्या जाते. त्याच्या विचारांना मानणाऱ्यानी निसर्गपूजक धर्माचा, निसर्ग देवतांचा, निसर्ग पूजक विधींचा नव्याने अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चन आणि ज्यू धर्मामध्ये असलेली पुरुषप्रधानता झुगारून, औपचारिकता बाजूला सारून, मानवी समाजावर त्यांचा अंकुश नाकारून एक स्वतंत्र, स्वायत्त विचार घेऊन आणि निसर्गाशी प्रत्यक्ष संपर्क साधून दैवीशक्तीशी समरूप होता येते ही मांडणी  ‘विचक्राफ्टधर्माने केली



पुजारी, मौलवी, पादरी यांच्यासारख्या दलालांना त्यात स्थान नाही. ‘स्त्रीत्यांच्यासाठीनरकाचे द्वार' नसून ती पूजनीय होती. संभोग त्यांना वर्ज्य नव्हता तर तो उत्सव होता. १९६०च्या दशकात निसर्गपुजकांमध्येविचक्राफ्टएक धर्म म्हणून आश्वस्त करत होता. त्यातील मुख्य  धारणा, मूल्ये आणि नियमन व्हायला लागले होते. असे असले तरी त्यात लवचिकता होती, प्रवाहीपण होते. ज्यामुळे धर्म म्हणून उत्क्रांत होण्याची मुभा मिळत होतीअध्यात्मिक, गूढवादी असा ईश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणून अनेकांना त्याचा मोह होत होता


    विचक्राफ्ट म्हणजे पर्यायाने निसर्गपूजकांचे अनेक पंथ उदयाला येत होतेच. मात्र या सर्वांची गोची एक गोष्टीमुळे झाली. ती म्हणजेविचक्राफ्टहा शब्द... 


            विच, डायन , सैतान यांची पूजा करणाऱ्यांनासुद्धा हाच शब्द उपयोजल्या जात असल्यामुळे, धर्म म्हणून त्यांच्याशी नकारात्मकता जोडल्या गेली. त्यामुळे मुख्य धर्मियांना विरोध करण्यासाठीं आयते कोलीत मिळाले. तसेही पुरुषप्रधान मानणाऱ्या धर्मांना हा स्त्रीप्रधान धर्म रुचला नाही. नैतिकतेचा आव आणणाऱ्यांना यातील संभोगविधी खटकत गेले. ख्रिश्चनांमध्येननकिंवापादरीयांना आजीवन ब्रह्मचर्य पाळावे लागत असे. त्याविरुद्ध भूमिका घेणारा धर्म त्यांना नाकबूल होता. देव आणि माणूस यांच्यातील दुवा म्हणूनदलाली' करणाऱ्यांना आपले महत्त्व कमी व्हायची भीती सतत वाटायची म्हणून आजपर्यंत त्या प्रत्येक धार्मिक चळवळीला त्यांनी नष्ट केले जे ईश्वराशी त्यांच्या शिवाय एकरूप होण्याचा विचार मांडत आले. विचक्राफ्ट हा त्यांच्या अस्तित्वाला धोका होता. त्यांनी पद्धतशीरपणे त्यांना संपवले



सोमवार, ३० मार्च, २०२०

Sirens … सुमधुर गीतांमुळे येणारा कर्कश मृत्यू...



आज Police Van, Ambulance आणि अशा अनेक ठिकाणी ‘सायरन’ हे यंत्र धोक्याची सूचना देण्यासाठी वापरतात..परंतु सायरन चा शोध लावणाऱ्या जॉन रोबिनसन याने १७९९-१८०० मध्ये ते एक संगीत वाद्य म्हणून शोधले होते...तर तेथून २० वर्षांनी दि-ला-तूर याने पाण्याखालीसुद्धा आवाज करू शकेल असे यंत्र शोधले ...दि-ला-तूर यानेच पहिल्यांदा त्याच्या यंत्राला ते पाण्याखालीसुद्धा आवाज करू शकते म्हणून ‘सायरन’ म्हणायला सुरुवात केली...
त्याला पाण्याखाली आवाज करणाऱ्या त्या यंत्रासाठी  ‘सायरन’ हेच नाव का सुचल असेल...? नेमका सायरनचा अर्थ काय...? चला शोधूयात त्यामागील कहाणी....

युलेसीस... हो तोच होमरच्या महाकाव्यातील नायक.... आपल्या जहाजाने ट्रोयच्या युद्धावरून परतीचा प्रवास करत असतो तेंव्हा त्याचे जहाज भरकटते. त्यामुळे त्याला आपल्या मूळ ‘इथाका’ या देशी पोहचायला दहा वर्ष लागतात..त्याचा हा परतीचा प्रवास खूप साहसी आणि अद्भुत असतो... याच प्रवासादरम्यान त्याचा सामना या ‘सायरन’शी होतो...

‘सर्शी’ नावाची चेटकिणी युलेसीसला सांगते कि, या परतीच्या प्रवासात,  उथळ खडकाळ समुद्र  लागेल किंवा एकलकोंडया  बेटाजवळ, खूप सुंमधुर गीत ऐकायला येतील.. ते गीत इतके भुरळ पाडणारे असतील कि आपसूकच तुझ्या खलाशांना त्या आवाजाकडे आपले जहाज वळवावेशे वाटेल.. अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे सर्व खलाशी ते गीत ऐकत बेटाकडे ओढले जातील.. तिथे त्यांना पक्षांसारखे शरीर असलेले  पण चेहरा सुंदर स्त्रीचा असलेल्या ‘सायरन’ दिसतील.. त्यांचे गाणे इतके मोहक आणि शांतता देणारे असेल  कि तिथून कुणालाही  पुढे जावेच वाटणार नाही..त्याना ते गीत ऐकल्यामुळे झोप यायला लागेल ... आणि तिथेच सगळ्यांचा जीव जाईल... तुम्हाला तुमच्या प्रवासापासून भटकवन्यासाठी..तुमचा अंत करण्यासाठी तिथे सायरन मृत्यूचे गीत गात असतील... सर्व झोपल्यावर ते सायरन जहाजावर येवून सगळ्यांना मारून टाकतील... म्हणून युलेसीस तुला काळजी घ्यावी लागेल... त्यांचे गाणे तुमच्या कानावर पडायला नको याची दक्षता घ्यावी लागेल.... तू तुझ्या खलाशांच्या कानात मेण ओतून त्यांना तात्पुरते बहिरे कर म्हणजे या संकटातून तुझे जहाज सुखरूप पुढे जाईल...

सर्शीचा हा सल्ला युलेसीस लक्षात ठेवतो..आणि प्रवासाला निघतो.... परंतु त्याला मात्र त्या सायरनचे गाणे ऐकायचे असते...म्हणून तो जहाज चालवणाऱ्या सर्व खलाशांच्या कानामध्ये मेण भरतो मात्र स्वताचे कान मोकळे ठेवतो.. इतकेच नाही स्वतःचा बचाव व्हावा यासाठी स्वताला जहाजाच्या  शिडाला करकचून बांधून घेतो जेणेकरून तो त्यांच्या गीताच्या मोहात येवून जहाजावरून उडी मारून जाऊ शकणार नाही.... जहाज चालवणाऱ्यानां आता ऐकायला येत नसल्याने ते सायरनपासून जहाजाचा बचाव करू शकतात तेंव्हा युलेसीस मात्र त्यांचे गाणे ऐकतो.. अशाप्रकारे तो एकमात्र व्यक्ती असतो जो  ‘सायरन’चे गाणे ऐक्ल्यावारही जिवंत राहतो...मायदेशी परतल्यावर त्याला या गोष्टीची शेखी मिरवायची असते म्हणून त्याने हा  सगळा उपद्व्याप केलेला असतो...

या ‘सायरन’ नेमक्या कोण...? त्यांच्या गाण्यामुळे मृत्यू का येतो?.. याचीसुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे... हेरा नावाच्या देवीने ‘सायरन’ आणि म्युसेस यांच्यापैकी कोण उत्कृष्ट गातो यासाठी स्पर्धा घेतली.. तीत सायरन हरल्या.. म्हणून समुद्र प्रवाशांसाठी मृत्युगीत गायची शिक्षा त्यांना झाली... त्यांचे गीत ऐकलेले खलाशी मरायलाच हवे अन्यथा सायरन मरतील असा दंडक होता.. युलेसीस मात्र सुखरूप वाचल्यामुळे तेंव्हाच्या सर्व सायरन नष्ट झाल्या असेही काही ठिकाणी उल्लेख आहेत...

असो...  ‘सायरन’बद्दल या आणि अशा अनेक छोट्या-मोठ्या ग्रीक दंतकथा आहेत.. कधी-कधी एकाच दंतकथेला वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यात आले आहे...त्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी मात्र ‘मृत्यू’ आहेच हे मात्र नक्की कि.. यांचे गाणे म्हणणे..गुणगुणने.. किंवा आवाज करणे म्हणजे ‘मृत्यू’ जवळ आहे याची सूचना देणेच होय.. मग धोक्याच्या सूचना देण्यासाठी जे ‘यंत्र’ आज आपण वापरतोय त्याला ‘सायरन’ म्हणणेच योग्य आहे, फरक इतकाच आजचे सायरन ‘कर्कश’ आहेत...आणि पाण्याखालीसुद्धा आवाज करू शकणाऱ्या आपल्या यंत्राला दि-ला-तूर याने ‘सायरन’ हे नाव का दिले याचेही उत्तर मिळाले....

ज्ञानेश्वर ग.गटकर
अमरावती.

अपरिचित धर्म, अद्भुत आस्था

     विचक्राफ्ट ( Witchcraft), हा दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेकडील सगळ्यात झपाट्याने वाढणारा धर्म होता .  जादू , टोना आणि तत्सम बा...