पहिला तुकडा:
मी आणि व्हिनस प्रेम करून थकलो होतो ... ती बेडवर घामेजली
होऊन आराम करत होती आणि दीर्घ श्वास घेऊन शरीर शांत करत होती... मी उठून किचनमधील
फ्रिजकडे गेलो. पाणी भरलेली बॉटल आणली आणि तिला दिली. तीने नजरेनेच धन्यवाद
दिले... तिला आता खायला काहीतरी लागेल, म्हणून
स्वयंपाकघरात शिरून तिच्यासाठी काही बनवायला पाहिजे याचा विचार करत होतो. एकवार
पाणी पिऊन शांत झोपलेल्या व्हिनसकडे बघितले व स्वयंपाक घरात जाईल तोच दारावरची बेल
कुणीतरी वाजवली...
मला माहीत होत दारावर कोण असेल.. !
म्हणजे काय, रात्रीचे आठ
वाजलेत .. डॉक्टर बेन्ट शिवाय कोण असेल... !
'डॉक्टर बेन्ट...
खूप हुशार माणूस... आज त्याच्यामुळेच मी जिवंत आहे... तो नसता तर माझं अस्तित्वच
नसते.. तो दारावर ताटकळत बसलाय.. खरतर त्याने आता यावेळी घरी यायला नको होत, असं मला मनापासून वाटायचं.. पण रोज तो
यायचाच.. त्याच्या येण्याला मी थांबवू शकत नव्हतो.. शेवटी हे त्याचेच तर घर
होते... मी त्याच्याच घरात मागल्या तीन महिन्यांपासून राहतोय... त्याला कस म्हणू
कि तू तुझ्याच घरी नको यायला..'
तो आत आला... मी त्याला नेहमीसारखे नाटकी स्मित दिले ..
त्याने मला नजरेने टाळले.. असो.. हे इतक्यात नेहमीच होतंय.. तो आता माझ्याशी
पूर्वीसारखा बोलत नव्हता.. मला पूर्वीसारखे काम सांगत नव्हता.. त्याला मी आता नको
असेल ... त्याची कारणेही मला ठाऊक होती म्हणा...
त्याने बूट काढले आणि मोजे उतरवताना विचारले "व्हिनस
कुठे आहे?".. मी नेहमीप्रमाणे
बेडरूमकडे बोट दाखवले... तो गळ्यातील टाय सैल करत बेडरूमकडे गेला... दारातूनच उघडी, निवळून शांत झालेल्या घामाच्या
ओलसरपणामुळे चमकणारी व्हीनस बघितली.. ती दीर्घ श्वास घेत झोपी गेली होती.. तसाच तो
मागे फिरला... माझ्याकडे खूप रागाने बघितले.. आणि वॉशरूमकडे निघून गेला...
त्याला लागते तशी कडवट कॉफी मला बनवायची होती.. हे नेहमीचेच असल्याने मी कॉफी बनवायला
घेतली.. व्हीनस अजूनही झोपलीच होती मात्र ती उठल्यावर तिला काहीतरी खायला लागेलच..
तेव्हड्यात मागून आवाज आला, " तू ... तू....आणि तूच जबाबदार आहेस या सगळ्याला...."
बेन्ट माझ्याकडे मारक्या म्हशीसारखा बघत होता.. मला त्याचे काहीच वाटले नाही.. आणि
त्याच्या अशा रागवण्याने मला काहीही फरक पडणार नव्हता.. कारण माझ्यासोबत.. व्हीनस
होती... हो व्हीनस .... तो मात्र असा विचित्र अडकला
होता कि त्याला काहीही करता येऊ शकले नसते...
"डॉक्टर बेन्ट, जरा हळू बोला व्हीनस उठेल आणि मग तुमचीच पंचाईत
होईल..."
"तू काय जादू केलीयेस या बाईवर नेमकी..?" बेन्ट म्हणाला.
"जादू!.. मी कसली जादू करू शकतो .. खरे जादूगार तर
तुम्ही... बघा माझ्याकडे... मी प्रत्यक्ष उदाहरण आहे तुमच्या जादूगिरीचे..."
"नीच..हलकट माणसा.. का भस्मासुर होऊन बसलाय माझ्या
आयुष्यावर..."
"डॉक्टर, तो विचार तुम्ही आधी करायला हवा होता..." मी तितक्याच
शांतपणे..
"मी आताही खूप काही करू शकतो... संपवू शकतो तुला...
कळलं?"
"संपवा.. नक्कीच संपवा मला.. पण मग व्हीनसचे काय... ती
नाही संपणार...?"
हीच हतबलता बघतोय मी कित्येक दिवसापासून बेन्टच्या
चेहर्यावर....बिचारा बेन्ट!....
दुसरा तुकडा:
मी चिडचिडत दिवाणखाण्यातील सोफयावर येऊन बसलो.. पाठोपाठ
त्याने मला कॉफी आणून दिली.. नेहमीपेक्षा जास्तच कडवट लागणाऱ्या कॉफीला अर्धवट
पिऊन डोळे बंद करून मान मागे टाकली... डोळे बंद होईपर्यंत सहा महिन्यापूर्वीच ते
सगळं आठवायला झालं...
ती...व्हीनसच
होती.. देखणी...तरुण... मी तिच्याकडे गेलो... आणि तिला सरळ विचारून टाकलं...
माझ्याशी लग्न करशील का?... ती चपापली... बरोबरच आहे... चाळीस वर्षांचा तरुण-म्हातारा
एका पंचविशीतील थरारत्या रक्ताच्या तरुणीला मागणी घातल्यावर कोणतीही तरुणी
बावचाळणारच... तशी ती गोंधळली..
".. खरं सांगू बेन्ट, हा विचार मलासुद्धा आला यापूर्वी.. आपल्यापेक्षा वयाने
मोठ्या माणसाशी नातं ठेवावं.. किती एक्सआयटींग वाटतंय.. पण तू त्याला हो म्हणशील
असं वाटलं नव्हतं .. आणि आता तूच मागणी घालतोयेस म्हटल्यावर थोडी गोंधळीच
मी..."
"का...मी नाही आवडणार तुला.. वय सोडलं तर बाकी मी
तुझ्यासाठी सुटेबल आहे... वैज्ञानिक म्हणून
नावाजलेला आहे, हुशार आहे..
बर्यापैकी पैसा कमावला आहे, कमावत आहे. तू आवडतेस, प्रेम तर करतोच आणि तुझ्या मर्जीसारखी मनमौजी वागण्याचं
स्वातंत्र्यसुद्धा तुला देऊ शकतो..जनरेशन गॅप वगैरे बोलशील तर तो फालतूपणा वाटतो..
मलासुद्धा तुमच्या पिढीतल्यासारख्या नवीन गोष्टी करायला आवडतात..आणि आज-काल कोणी
बघत नाही ग वय-बीय... बघ विचार कर... "
ती थोडी सावरत बोलली, " आपण एक करू... लग्नाआधी लिव्ह -इन मध्ये राहायचं का?.. म्हणजे कळेल आपल्याला, पुढे नात्याचं काय होऊ शकत... बघू तर तू
किती जिकंतोस मला..."
"विचार तसा वाईट नाहीय... आणि तुला जिंकायचं म्हणजे
काय... तूला खुश ठेण्यासाठी, तुझया इच्छा पूर्ण
करण्यासाठी मी काहीही करेल...बघ तू..."
... आणि आम्ही लिव्ह-इन मध्ये सोबत राहायला लागलो... पहिले
काही दिवस स्वप्नातल्यासारखे होते.. फिरायला जायचो..पब... पार्टी आणि प्रवास...
तिच्यासोबत मलासुद्धा पंचविशीतील झाल्यासारखे वाटायला लागले... पण....
बेडरूममध्ये......थोडं तिच्याशी जुळायला त्रासच होत होता.... तीच चैतन्य झेपावत
नव्हतं कधीकधी.... तिच्यासमोर मी सुस्तावला वाटायचो... ती कशी सिझलिंग आणि
चुटपुट.... पण खूप मस्त वाटायची मला... तिचा सहवास मला शोषून घ्यायचा.. तिचा
स्पर्श ज्वाला पेटवायचा.. हो ती मला हवीच होती.. नेहमीसाठी... प्रेमापलीकडे जाऊन
तिची सवय होत होती मला...तिच्या सहवासाचे व्यसन लागलंय मला... ती आहे तर प्राण आहेत.. आवड मग प्रेम आणि नंतर व्यसन व शेवटी
पागलपण अशी चढती रेष आमच्या नात्यात अनुभवत होतो मी... फक्त अडचण होती ती हीच कि
हिला पाहिजे तस शरीरसुख मी देऊ शकतो का...ती कधी बोलून दाखवत नव्हती पण बेडवर थोडी
अतृप्तच वाटत होती... मीच ठरवलं नंतर कि थोडं नवीन काहीतरी करत राहायचं...
शरीरसुखाला आणखी एक्स्प्लोर करायचं.. तिच्यासाठी....
मित्रांच्या चावट
गोष्टींमधून मला कळत गेलं कि तरुणांना नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात.. त्यांच्या
काही सेक्स फँटसी असतात... व्हिनसची असली काही फँटसी असेल का? तिला विचारायला हवं.. थोडं आणखी ओपन
व्हायला हवं...
त्यारात्री.. तिला विचारलंच...
"व्हिनस, तुला नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात... "
"हं!"
"मग मला सांग तुझी एखादी फँटसी असेल न... म्हणजे सेक्स
फँटसी..पूर्ण न झालेली"
"हो...आहे...खूप आहेत....त्यातल्या तुझ्याशी काही
पूर्ण केल्यात... "
"..पण अजूनही एखादी जी पूर्ण झाली नाही अशी..?"
"......थ्रीसम... पण ती कशी पूर्ण होणार बेन्ट.. तुझं
माझ्याबद्दलच पागलपण बघून दुसऱ्या पुरुषाने मला हात लावलेलं तुला आवडेल असं वाटत
नाही... त्यामुळे चल झोप आता.. " आणि ती विन्मुख होऊन झोपी गेली...
तिसरा तुकडा:
मी झोपेतून उठली आणि बघितलं तर बेन्ट बिछान्यात नव्हता...
मागल्या काही दिवसापासून बेन्ट पहाटेलाच उठून कामावर जायचा.. त्याला विचारलं तर
सांगे प्रयोगशाळेत एक प्रोजेक्टवर
काम करतोय. तसा तो माझ्याशी खोटं बोलत नाही.. पण त्याला विचारलं कि कसला प्रोजेक्ट
आहे तर म्हणायचा.. "तुला सरप्राईझ आहे..बस इतकेच लक्षात ठेव.." .. मला कळत नव्हतं कि यांच्या प्रोजेक्टचा
आणि माझा काय संबंध.. हा एक जीवशास्त्रज्ञ.. याचे प्रोजेक्ट म्हणजे काय तर ते पेशी
आणि त्यातील जनुकं, त्या स्टेमसेल आणि
कृत्रिम गर्भ, तो क्लोन आणि डी.
एन.ए. आणि काय नि काय.... यातून कुठलं सरप्राईझ देणार हा मला...
पण त्याने दिलेलं सरप्राईझ अनाकलनीय होत.. अनपेक्षित होत...
अचंबित करणार होत...
बेन्ट एक दिवस रात्री उशिरा परत आला...त्याला इतक्यात यायला
उशीर व्हायचाच.. त्याच्याशी लिव्ह-इन मध्ये राहायला आल्यापासून त्याच्यात होणारे
बदल मला कळत होते. सुरुवातीला छान राहायचा... हसत-खेळत... पण नंतर थोडा अबोल होत
गेला... तरी त्याचे माझ्यावरील प्रेम कमी झाले
नाही... उलट तो जास्तच माझ्यात गुंतत होता. माझ्याशिवाय तो राहू शकेल असं वाटत
नव्हतं.. खरं सांगू, मला त्याच्यासोबत
लिव्ह-इन मध्ये राहायला आधी आवडलं.. आमचं 'चिनी-कम' वाली लव्ह स्टोरी होईल अशा रोमँटिक जगात
वावरत होती.. खरतर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाबद्दल मला प्रचंड आकर्षण
वाटायचं.. अशा माणसाची समज, त्याची शांत
वृत्ती आणि आपल्या तारुण्याने त्याला मोहित करूंन त्याच्यावर अधिकार गाजवण्यामागील
एकसाईटमेन्ट ...माझी छुपी फँटसी होती हि...बेन्ट त्यात फिट्ट बसत होता...
सुरुवातीला सगळं छान वाटलं... पण त्याच्या आणि माझ्या वयातील फरकामुळे आमच्यातील
नातं हवं तस विणल्या जात नव्हते.. तो थोडा संथ आणि कमी उत्साही.. मला नवीन गोष्टी करून बघायची हौस पण
त्याचा उत्साह कमी पडायचा.. खूपदा मी अतृप्तच
राहायची.. वाटायचं बरे झाले यांच्याशी सरळ लग्न केले नाही ते... लिव्ह-इन मधून
सुटू तरी शकते...पण समजा लग्न केलं असते तर...??
माझी तगमग आणि अतृप्ती बेन्टच्या लक्षात येत होती... किंवा
तशी ती यावी आणि त्याने मला या नात्यातून मोकळं करावं असं मनोमन वाटत होत... पण तो
तर अगदीच प्रेमात वेडा होत होता. त्याचे मन मारून मला निघून जावेसे वाटतही नव्हते.
अशातच त्यानेही माझ्यासाठी नव्या गोष्टी करायला सुरुवात केली.. तो थोडा सेक्सबद्दल
ओपन झाला.. मोकळा बोलायला लागला... मला विचारायला लागला... माझ्या फँटसी समजून
घ्यायला लागला... मी त्याला अनेक फँटसि सांगितल्या.. तो त्या पूर्ण करण्याचा
प्रयत्न करायचा... त्यातील काही फँटसि पूर्ण करणे त्याला शक्य नव्हत्या... म्हणजे
कि मला नेहमी वाटायचे कि मला एकाचवेळी दोन पुरुषांनी उपभोगाव.. पण बेन्ट त्यासाठी
तयार होईल असं वाटलं नव्हतं....तस त्याबद्दल एकदा आमचे बोलणेही झाले. पण बस
बोलणेच... त्यानंतर त्याने कधी तो विषय काढलासुद्धा नाही....
चौथा तुकडा:
'तू इथेच दारावर थांब... मी आत जातो... मी आवाज दिल्यावरच आत
ये..." मी त्याला सांगितले.
"हो,बेन्ट" आपली
टाय व्यवस्थित करत तो म्हणाला.
रात्र थोडी जास्तच झाली असल्याने व्हिनस झोपली असेल... मी
माझ्या जवळच्या किल्लीने दार उघडून घरात शिरलो. व्हीनस शांत डोळे मिटून विचार करत
होती.. तिच्याजवळ जात तिला म्हटले,
"कशी आहेस, कसला विचार करतेस?"
ती डोळे उघडत म्हणाली "तुझाच"
"अरे वा, काय विचार तो..?
"हेच कि तू माझ्याशिवाय राहू शकशील का?"
"का?, तू मला सोडून जाणारेस का?"
"समजा... गेली, मग?"
"असं नको न बोलूस, व्हीनस...... मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय"
"मग...आता?"
"तुझ्यावर मला माझा हक्क सांगावासा वाटतो... म्हणजे बघ, तुझ्यासारखी स्त्री माझी आहे हे मिरवण्यातच किती वेगळी
फिलिंग आहे.. आणि मी माझी स्त्री गमावणार नाही... कुठल्या नराला वाटेल कि त्याची
मादी दुसऱ्या नराची व्हावी..?"
ती फक्त गालातल्या गालात हसत होती..." का, हसायला काय झालं?"
"तेच... मीही तोच विचार करत होती.. कि तू मला विचारलंस
माझी फॅन्टसी काय? मी सांगितलं होत
कि मला थ्रीसम करायला आवडेल.. पण तुला ते चालणार नाही... तुला दुसऱ्या पुरुषाने
माझ्याशी प्रेम केलेलं .."
तिला मध्येच थांबवत मी म्हणालो, "थांब... तुला दुसर्या पुरुषाने स्पर्श न
करता, तुझी हि फॅन्टसी
मी पूर्ण केली तर...?"
"ते कस शक्य आहे बेन्ट, तिसरा पुरुष तर लागणारच न त्यासाठी..."
"तेच तर सरप्राईझ आहे ..तुझ्यासाठी"
माझ्या या वाक्यावर तिच्या चेहरा विचित्र बदलला होता.
नक्कीच, मी काय बोलतोय हे
तिला कळणार नव्हते.. आणि त्यातच माझ्या सरप्राईझची गम्मत होती. मी जे केलं त्यातून
तिला कळेल कि तिच्यासाठी मी काहीही करू शकतो, ती फक्त माझी आणि माझीच बनून राहावी यासाठी मी किती धाडस
केलं याची जाणीव तिला होईल...
तिला तस म्हणून मी दारावरील त्याला आवाज दिला.. आणि तो आत
आला...
पाचवा तुकडा:
बेन्ट मला दाराशी उभा करून आत निघून गेला. त्याने आवाज
देईपर्यंत मी आत शिरायचे नाही अशी ताकीद दिली त्याने. त्याचा हुकूम मला ऐकावाच
लागणार होता. तो मालक होता माझा.. मी निमूट्पणे त्याच्या बोलावण्याची वाट बघत
होतो. मला खरतर त्याचा गुलाम बनून राहावं असं वाटत नव्हते.. पण पर्याय नव्हता.
माझ्यात विचार त्याचे होते पण समज स्वतंत्र होती.. निर्माण त्याने केले तरी मी
स्वतंत्र राहू शकलो असतो..त्याच्या मदती शिवाय...मीसुद्धा एक हाड मासाचा आणि जिवंत
माणूसच होतो त्याच्यासारखा...
... आणि त्याने मला आवाज दिला. मी दार उघडून आत शिरलो. समोर
बेन्ट आणि त्याची बायको व्हीनस.. मला बघून तिला घेरीच आली... मला थोडं
हसायलासुद्धा आलं तिची अवस्था बघून... ती भांबावल्या नजरेने कधी मला बघत होती तर कधी बेन्टला..
तिच्या नजरेत आश्चर्य होते आणि प्रश्नसुद्धा... तिने बेन्टला विचारले,
"बेन्ट!!! हे काय आहे नेमके?"
"सरप्राईझ!!"
"...?"
"व्हीनस, बघ... तुझ्यासाठी आणखी एक पुरुष आणलाय... तुझी फॅन्टसी
पूर्ण करायला"
"पण ..पण हा अगदी तुझ्यासारखाच दिसतोय...?"
"तेच तर... तुला तुझी इच्छा पूर्ण करायची होती...त्यासाठी
दुसरा पुरुष हवा होता.. परक्या पुरुषाने तुला स्पर्श करावा हे मला चाललं नसत..कारण
तू फक्त माझी आहेस... मग काय, मी मलाच आणलं.. हा
म्हणजे मीच...माझंच प्रतिबिंब... तुझाच
बेन्ट...हा आहे माझा क्लोन.. दुसरा बेन्ट... तुझी फँटसि पूर्ण करायला मी तयार केलाय...
चोरून, सगळ्यांच्या चोरून
माझ्या प्रयोगशाळेत.. रोज पहाटे लवकर उठून याच कामगिरीवर जायचो... आता मी आणि हा
असे दोन पुरुष तुला एकाचवेळी उपभोगता येतील.. तुझी फँटसि पूर्ण होईल... आता तर
पटलं तुला, कि तुझ्याप्रेमाखातर मी काहीही करू शकतो..
तुला मिळवण्यासाठी.. जिंकण्यासाठी ... "
बेन्ट अर्धा तास तिच्याशी असाच बडबडत होता.. क्लोन कसा तयार
केला, तिच्यावर त्याचे
किती प्रेम आहे, तिची इच्छा,फँटसी आणि असेच काहीबाही... त्याच्या
त्या बड्बडीचा मला खरेतर कंटाळा आला होता.. पण काय करू.. त्याच ऐकावेच लागेल मला..
तो माझा मालक... हो मालक... नाही, पण हे असं किती दिवस ऐकू मी त्याच...
यावर काहीतरी करायला हवं... पण काय?
सहावा तुकडा:
बेन्टने बनवलेला क्लोन... आणि बेन्ट... या दोघांमध्ये खरतर
काहीच फरक नव्हता... पण मला मात्र जाणवायचा.. बेन्टच्या स्पर्शात प्रेम होते... तर
त्याच्या स्पर्शात शरीरसुख.. बेन्ट गोंजारायचा तर तो कुचकारायचा... मला दोन्ही हवे
होते... तो अनुभव वेगळा होता... प्रचंड तृप्तीच्या किनाऱ्यावर पोचवणारा... रोज
रात्री त्या लाटांमध्ये मी चिंब होऊन किनाऱ्याला पोचायची... थकायची पण तो थकवा
खडीसाखर विरघळण्याइतका गोड वाटायचा.. कधीकधी तर
बेन्टपेक्षा त्याचा सहवास जास्त प्रिय वाटायचा... बेन्ट तसाही दिवसभर बाहेर
प्रयोगशाळेत किंवा इतर कामात गर्क असायचा... हा मात्र दिवसभर माझ्या सोबत. मला
हवं-नको ते बघत .. वाटेल तेंव्हा प्रेम करायला तयार.. मी बेन्टपेक्षा याच्यातच गुंतत जात आहे
असं वाटायचं... त्याच्या पूर्वीच्या राकट स्पर्शात आता थोडं प्रेम पाझरायला लागलाय
हे सुद्धा जाणवायचं.. मी त्याच्याही प्रेमात पडत जात होते... पण हे योग्य नव्हतं..
तो बेन्ट नव्हता... पण बेन्टच तर होता...!? काही सुचत नव्हते मला.. जस सुरु आहे तस सुरु राहू द्यावं...नाही,नको एकदिवस याचा शेवट तर करावाच... पण
.... बेन्टलासुद्धा आता कळत असेल कि त्याची व्हीनस दूर जातीय म्हणून.. त्याच्या
क्लोनमध्येच अडकून बसलीय म्हणून...
सातवा तुकडा:
माझी व्हीनस.. आता तिला माझी कशी म्हणून.. माझ्यातल्याच एक
अंशापासून तयार झालेल्या त्या राक्षसाने तिला आपलेसे केलंय.. बघातोय मी तिला , ती कशी झोपली आहे ते... घामाने भिजलेल्या अंगाने. याला घरी
आणले ती चूकच झाली. बाहेर असतांना डोक्यात या दोघांच्या विचाराने वेड व्हायला
होत.. सतत हा व्हीनसजवळ असेल, तिच्या
बाहुपाशात.. तीसुद्धा तितकीच मुलायम होवून, आपले विस्मरण करून
विरघळत असेल.. आताही बघतोय, मला पाहिजे तशी
कडवट कॉफी बनवून हा तिच्यासाठी काहीतरी खायला बनवायला म्हणून किचनमध्ये गेलाय.. आणि याच्याच प्रेमात आहे ती.. ती झोपली
आहे तोपर्यंत याला मारून टाकवे..हो आज रात्री मी त्याला संपवणारच. त्याला मारले म्हणजे
मी कुठे काही जेलमध्ये थोडीच जाणार आहे.. त्याच अस्तित्व फक्त माझ्या घराच्या आत
आहे.. तो आहे हे कुणाला माहीतही नाही.. मारून बंगल्यातल्या आवारात दफन केले तरी
कुणाला कळणार नाहीच.. कारण तो मीच आहे.. तो मेला तरी मी जिवंत राहणारच... हो मी
त्याला आज ठार मारेलच... तो तिकडे माझ्यासाठी कॉफी बनवून गेलाय...त्याच्या
पाठीमागे उभा राहून सरळ अख्खे पिस्तुल रिकामे करतो.. संपवतो एकदाचे.. हो, माझ्या ड्रॉवरमधील
पिस्तूल काढून एका फटक्यात याला संपवतो आज...
आठवा तुकडा:
मी दार लावून आत आलो. मातीने माझे कपडे मळले होते. तसाच
वॉशरूममध्ये गेलो. जाताना सोफ्यावरील पिस्तूल उचलले, ते न चालवलेले होते.. तसेच ड्रावरमध्ये ठेवून दिले... मी केलेल्या कामाची कुणालाही खबरबात नाही.. प्रेताला दफन
करताना त्याच्याशी जुळलेल्या सगळ्या वस्तूसुद्धा दफन करून आलो.. त्याला दफन करतांना अस वाटत होत कि मी मलाच
दफन करतोय.. किती सारखे दिसायचो आम्ही...असो... आता तो संपलाय, मीच भोगणार व्हीनसला नेहमीसाठी...ती
अजूनही झोपलीच आहे, ती उठल्यावर तिला सगळं सांगावं का हा विचार मनात घोळत
होतो.. तीन तासापासून झोपली आहे.. इथे काय महाभारत घडले याचा तिला पत्तासुद्धा नाहीय.. मग तिला मुद्दाम आवाज दिला.... ती डोळे चोळत बाहेर आली... तिने मला आळसावली मिठी दिली .
तिचे सैलसर हात खांद्यावरून बाजूला करत,ती
मिठी सोडवत बाजूला झालो... तिला सोफ्यावर बसवून तिला कॉफीसाठी
विचारले..तिने हो म्हणताच कॉफी बनवायला किचनमध्ये निघून गेलो... माझ्या
व्हीनससाठी आता पुन्हा कॉफी बनवायची होती..फक्त तिच्यासाठी मी फक्कड गोड
कॉफी बनवणार आहे... कडवट नको...नकोच कडवट...!!!!