आज Police Van, Ambulance आणि अशा अनेक ठिकाणी ‘सायरन’ हे यंत्र धोक्याची
सूचना देण्यासाठी वापरतात..परंतु सायरन चा शोध लावणाऱ्या जॉन रोबिनसन याने
१७९९-१८०० मध्ये ते एक संगीत वाद्य म्हणून शोधले होते...तर तेथून २० वर्षांनी दि-ला-तूर याने
पाण्याखालीसुद्धा आवाज करू शकेल असे यंत्र शोधले ...दि-ला-तूर यानेच पहिल्यांदा त्याच्या
यंत्राला ते पाण्याखालीसुद्धा आवाज करू शकते म्हणून ‘सायरन’ म्हणायला सुरुवात
केली...
त्याला पाण्याखाली आवाज करणाऱ्या त्या
यंत्रासाठी ‘सायरन’ हेच नाव का सुचल असेल...?
नेमका सायरनचा अर्थ काय...? चला शोधूयात त्यामागील कहाणी....
युलेसीस... हो तोच होमरच्या महाकाव्यातील
नायक.... आपल्या जहाजाने ट्रोयच्या युद्धावरून परतीचा प्रवास करत असतो तेंव्हा
त्याचे जहाज भरकटते. त्यामुळे त्याला आपल्या मूळ ‘इथाका’ या देशी पोहचायला दहा
वर्ष लागतात..त्याचा हा परतीचा प्रवास खूप साहसी आणि अद्भुत असतो... याच
प्रवासादरम्यान त्याचा सामना या ‘सायरन’शी होतो...
‘सर्शी’ नावाची चेटकिणी युलेसीसला सांगते कि, या परतीच्या
प्रवासात, उथळ खडकाळ समुद्र लागेल किंवा एकलकोंडया बेटाजवळ, खूप सुंमधुर गीत ऐकायला येतील.. ते गीत
इतके भुरळ पाडणारे असतील कि आपसूकच तुझ्या खलाशांना त्या आवाजाकडे आपले जहाज
वळवावेशे वाटेल.. अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखे सर्व खलाशी ते गीत ऐकत बेटाकडे ओढले
जातील.. तिथे त्यांना पक्षांसारखे शरीर असलेले पण चेहरा सुंदर स्त्रीचा असलेल्या ‘सायरन’
दिसतील.. त्यांचे गाणे इतके मोहक आणि शांतता देणारे असेल कि तिथून कुणालाही पुढे जावेच वाटणार नाही..त्याना ते गीत
ऐकल्यामुळे झोप यायला लागेल ... आणि तिथेच सगळ्यांचा जीव जाईल... तुम्हाला तुमच्या
प्रवासापासून भटकवन्यासाठी..तुमचा अंत करण्यासाठी तिथे सायरन मृत्यूचे गीत गात असतील...
सर्व झोपल्यावर ते सायरन जहाजावर येवून सगळ्यांना मारून टाकतील... म्हणून युलेसीस
तुला काळजी घ्यावी लागेल... त्यांचे गाणे तुमच्या कानावर पडायला नको याची दक्षता
घ्यावी लागेल.... तू तुझ्या खलाशांच्या कानात मेण ओतून त्यांना तात्पुरते बहिरे कर
म्हणजे या संकटातून तुझे जहाज सुखरूप पुढे जाईल...
सर्शीचा हा सल्ला युलेसीस लक्षात ठेवतो..आणि
प्रवासाला निघतो.... परंतु त्याला मात्र त्या सायरनचे गाणे ऐकायचे असते...म्हणून
तो जहाज चालवणाऱ्या सर्व खलाशांच्या कानामध्ये मेण भरतो मात्र स्वताचे कान मोकळे
ठेवतो.. इतकेच नाही स्वतःचा बचाव व्हावा यासाठी स्वताला जहाजाच्या शिडाला करकचून बांधून घेतो जेणेकरून तो
त्यांच्या गीताच्या मोहात येवून जहाजावरून उडी मारून जाऊ शकणार नाही.... जहाज
चालवणाऱ्यानां आता ऐकायला येत नसल्याने ते सायरनपासून जहाजाचा बचाव करू शकतात
तेंव्हा युलेसीस मात्र त्यांचे गाणे ऐकतो.. अशाप्रकारे तो एकमात्र व्यक्ती असतो जो
‘सायरन’चे गाणे ऐक्ल्यावारही जिवंत
राहतो...मायदेशी परतल्यावर त्याला या गोष्टीची शेखी मिरवायची असते म्हणून त्याने
हा सगळा उपद्व्याप केलेला असतो...
या ‘सायरन’ नेमक्या कोण...? त्यांच्या गाण्यामुळे
मृत्यू का येतो?.. याचीसुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे... हेरा नावाच्या देवीने ‘सायरन’
आणि म्युसेस यांच्यापैकी कोण उत्कृष्ट गातो यासाठी स्पर्धा घेतली.. तीत सायरन
हरल्या.. म्हणून समुद्र प्रवाशांसाठी मृत्युगीत गायची शिक्षा त्यांना झाली...
त्यांचे गीत ऐकलेले खलाशी मरायलाच हवे अन्यथा सायरन मरतील असा दंडक होता.. युलेसीस
मात्र सुखरूप वाचल्यामुळे तेंव्हाच्या सर्व सायरन नष्ट झाल्या असेही काही ठिकाणी
उल्लेख आहेत...
असो... ‘सायरन’बद्दल या आणि अशा अनेक छोट्या-मोठ्या ग्रीक
दंतकथा आहेत.. कधी-कधी एकाच दंतकथेला वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यात आले आहे...त्या
सगळ्यांच्या केंद्रस्थानी मात्र ‘मृत्यू’ आहेच हे मात्र नक्की कि.. यांचे गाणे म्हणणे..गुणगुणने..
किंवा आवाज करणे म्हणजे ‘मृत्यू’ जवळ आहे याची सूचना देणेच होय.. मग धोक्याच्या
सूचना देण्यासाठी जे ‘यंत्र’ आज आपण वापरतोय त्याला ‘सायरन’ म्हणणेच योग्य आहे,
फरक इतकाच आजचे सायरन ‘कर्कश’ आहेत...आणि पाण्याखालीसुद्धा आवाज करू शकणाऱ्या
आपल्या यंत्राला दि-ला-तूर याने ‘सायरन’ हे नाव का दिले याचेही उत्तर मिळाले....
ज्ञानेश्वर ग.गटकर
अमरावती.

३ टिप्पण्या:
Hi Katha aajchya ya Corona chya sankatat 'Sayran' ya shabdala agdi arthapurna kartey.. Aaj sayran Cha awaaj ala ki lokanna chi vatnari bhiti daat hotey..
ज्ञानेश्वर सर खूप सुंदर माहिती दिली तुमच्याकडे अद्भुत माहिती संग्रह आहे हे आम्हाला माहीतच आहे खरंच खूप सुंदर तिने सायरन बद्दल तुम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे धन्यवाद.....
सायरन ची दंतकथा अगदी अनुरूप वाटते. मला तर लहान असल्यापासन सायरन च्या आवाजाची भीती वाटत आली आहे. ऍम्ब्युलन्स, firebriged, police, कुठे तरी मोठी आपत्ती आली असे वाटते आवाज एकला की.
टिप्पणी पोस्ट करा