कॅडमस ने हार्मोनियाशी लग्न केले, पण त्यापूर्वी...
कॅडमस म्हणजे ज्याने थेब्स
राज्याची स्थापना केली....परंतु थेब्स राज्य निर्माण करत असताना तो ‘अरिस’ देवाच्या मंदिरातील एका सर्पाला दगडाने ठेचून ठार मारतो व अथेना देवीच्या
सांगण्यावरून त्या सर्पाचे दात आपल्या भूमीत पेरतो ज्यातून त्याची जमीन सुपीक होते
व त्या पेरलेल्या दातातुंच योद्धे जन्माला येतात जे पुढे थेब्सचे रक्षणकर्ते
होतात. अशाप्रकारे कॅडमस थेब्सचा पहिला संस्थापक सम्राट बनतो व अफ्रोडाइटच्या
मुलीशी म्हणजे हार्मोनियाशि लग्न करतो... अस म्हणतात कि या दोघांच्या लग्नसमारंभात
सर्व ग्रीक देवी-देवता उपस्थित होत्या.... त्यातील हेपेस्थस (अफ्रोडाइटचा नवरा
परंतु तिच्या अरीसशी विवाहबाह्य संबधातून हार्मोनिया जन्माला आली ) या देवांच्या
लोहाराला आफ्रोडाईटचा प्रचंड राग आलेला असतो त्याचा बदला घ्यावा म्हणून तिच्या
मुलीला म्हणजे हार्मोनियाला लग्नाची भेट म्हणून एक शापित कंठाहार (नेकलेस) देतो...
या कंठाहाराचे वैशिष्ट्य म्हणजे,
हा हार बाळगणाऱ्याच्या नशिबात
नेहमी वाईट गोष्टी घडतात... आणि त्याचा विनाश अटळ असतो....अशा कित्येक लोकांना त्या
हाराने आधी उध्वस्त केलेलं असते. कुणाचा मुलगा वेडा केलेला असतो किंवा त्यामुळे
कुणाचे वडील मरण पावलेले असतात,
कुणाची मुलगी मरण पावते तर कुणाचे
घर जळते...परंतु या गोष्टीपासून हार्मोनिया अनभिज्ञ असते...
त्या शापित कांठाहाराचा परिणाम
असेल म्हणून कॅडमस व हार्मोनियाला थेब्स गमवावं लागते व ते देशोधडीला लागतात...
नंतर ते आपल्या देशापासून दूर
इलेरीया या देशात येतात तिथे त्यांचा रानटी जमातीशी सामना होतो…पण नंतर त्यांच्याच सहयोगातून ते इलेरीया येथे पुन्हा नवीन
साम्राज्य स्थापन करतात. थेब्स सोडल्यापासून इलेरीया स्थापन करेपर्यंत त्यांना
अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात...खूप दु:ख भोगावे लागते.. एक शापित जीवन
जगावं लागते...
शेवटी कॅडमसला या दुखाचे कारण
समजते... ते म्हणजे, अरीस या देवाने दिलेला शाप.... थेब्स राज्य स्थापन करतेवेळी जो
सर्प कॅडमसने ठार केला असतो,
तो अरीसला खूप प्रिय होता... त्या
कृत्याचा बदला म्हणून अरीस कॅडमसला शापित करतो आणि दुख भोगायला लावतो...
.
आपल्या दुखाचे कारण जेंव्हा कॅडमसला कळते तर तो आश्चर्यचकित होतो... तो ईश्वराला म्हणतो कि एक देव जर सर्पाला इतके प्रेम करत असेल तर मलाही मानवी रूप नकोय.. मलासुद्धा सर्प बनायचे आहे... त्याची हि विनंती ईश्वर मान्य करतो व तिथे सगळ्या दरबारसमक्षच हार्मोनियाच्या डोळ्यांदेखत त्याचे परिवर्तन सर्पात व्हायला लागते...
.
आपल्या दुखाचे कारण जेंव्हा कॅडमसला कळते तर तो आश्चर्यचकित होतो... तो ईश्वराला म्हणतो कि एक देव जर सर्पाला इतके प्रेम करत असेल तर मलाही मानवी रूप नकोय.. मलासुद्धा सर्प बनायचे आहे... त्याची हि विनंती ईश्वर मान्य करतो व तिथे सगळ्या दरबारसमक्षच हार्मोनियाच्या डोळ्यांदेखत त्याचे परिवर्तन सर्पात व्हायला लागते...
ओविड या कवीने आपल्या ‘मेटामॉरफोसीस’
या ग्रंथात या प्रसंगाचे सुंदर
काव्यात्मक वर्णन केलेले आहे,
त्याचा स्वैर अनुवाद देतोय,
‘ खुप वर्ष अपेष्टा आणि हाल सहन करून थकलेला कॅडम, व त्याची संगिनी हार्मोनिया जी कधीही त्याच्यापासून विलग झाली
नाही... दोघेही आता इलेरीयाट आपल्या गतवैभव व सुखाच्या स्मरणात रममाण
आहेत..एकमेकांशी बोलतायेत... सुख-दुखाचे दिवस आठवतायेत...तो तिला म्हणतो...माझ्या
भाल्याने (काही ठिकाणी दगडाने/दगडी भाल्याने ) मी त्या देवांना प्रिय असलेल्या
सर्पाला मारले नसते तर त्यांनी आपल्यावर सूड उगवला नसता... देवांना सर्प इतका
प्रिय असेल तर मलाही सर्प झालेलं आवडेल...आणि...
त्याने ते शब्द उच्चारताच तो
जमिनीवर सरपटायला लागला... त्याच्या शरीरावर काळे-पांढरे चट्टे पडायला लागले...
त्याचे दोन्ही पाय एकमेकात गुरफटू लागले आणि ते एकरूप होत-होत शेपटीसारखे दिसायला
लागले... मात्र त्याचे हात अजूनही शाबूत होते आणि गालसुद्धा.. त्या मानवी
गालांवरून अश्रू ओघळायला लागले...आणि तो आपल्या बायकोला म्हणाला...
‘ये प्रिये, ये एकदाचा स्पर्श होवू दे तुझा... कारण अजून स्पर्श करण्यासाठी हात
तितके शिल्लक आहेत.. मी अजून मी आहे... मी पूर्ण सर्प होण्याआधी.. हे हात नाहीसे व्हायच्या आधी एकदा स्पर्शून घेऊयात..'
त्याला अजून काहीतरी बोलायचे होते
पण त्याची जीभ दुभंगली जाते .. बोलायचा प्रयत्न करायचा तर तोंडावाटे सित्कार
नुसता...असहाय होवून तो तिच्या वक्षस्थळांवर दंश करतो...
हार्मोनिया त्याला म्हणते कि,
‘कॅडमस हे तुझे भयानक रूप नकोय...अरेरे... तुझे पाय तर नाहीशे झालेच पण आता, हातसुद्धा नाहीयेत..तुझा रंग, तुझे रूप...सगळ बदललय ... तू असा असतांना मी मानव म्हणून कशी जगू... मलासुद्धा देवाने सर्प बनवले तर बरे होईल...’
‘कॅडमस हे तुझे भयानक रूप नकोय...अरेरे... तुझे पाय तर नाहीशे झालेच पण आता, हातसुद्धा नाहीयेत..तुझा रंग, तुझे रूप...सगळ बदललय ... तू असा असतांना मी मानव म्हणून कशी जगू... मलासुद्धा देवाने सर्प बनवले तर बरे होईल...’
आणि....सर्प झालेला कॅडमस आपल्या
पत्नीच्या गालावरून, मानेवरून, छातीवरून फिरायला लागला..तिला मिठी मारायला लागला... ते दृश्य
बघणारे दरबारी घाबरत होते पण ती मात्र त्याला कुरवाळत होती...कुरवाळत- कुरवाळत ती
सुद्धा त्याच्याशी मिसळत होती आणि पाहता-पाहता तिथे आता दोन सर्प एकमेकात वेटोळे
घालून उजागर होत होते... ते दोन सर्प...शांत होते.. त्यांनी कुणालाही त्रास दिला
नाही कि कुणाला दंश केला नाही.....”
अशी हि हार्मोनिया... अफ्रोडाइट
या सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या देवतेची मुलगी.. आपल्या नवऱ्यासाठी स्वतःच्या
अस्तित्वाला समर्पित करणारी हार्मोनिया... त्याच्याशी एकरूप झालेली... त्याच्याशी
अतूट बंधनात बांधल्या गेलेली हार्मोनिया... नात्याची एक हार्मनी....
नंतर -नंतर तिची लग्न बंधनात बांधल्या गेलेल्या स्त्री-पुरुषातील
आत्मिक, भावनिक व शारीरिक प्रेमाची देवी म्हणून पूजा केल्या जायला लागली...
तिने त्या नात्याला ‘हार्मनी’ दिली... लाग्नावेळी तिचे नाव घेवून एकमेकाला सोबत द्यायची शपथ
घेण्याची पद्धत सुरु झाली...म्हणून लग्न दोन जीवांना बांधून ठेवते..ती दोन
आत्म्याची जोडणी असते... त्यालाच आपण हार्मनी म्हणतो.. पुढे रोमन लोक हार्मोनियाला
‘कॉन्कॉर्डीया’
(Concordia) म्हणून संबोधू लागले.. आणि गंमत
म्हणजे त्याही शब्दाचा अर्थ तोच होतो..’जोडणे,बांधणे, एकरूप करणे’
३ टिप्पण्या:
फार सुंदर लेखन सर
फार सुंदर लेखन सर
http://nathapainter.blogspot.com
टिप्पणी पोस्ट करा